Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » हिलरी क्लिटंन यांचे निवडणूक अभियान सुरू

हिलरी क्लिटंन यांचे निवडणूक अभियान सुरू

Hillary Clintonन्यूयॉर्क, [१४ जून] – अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत उतरलेल्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी शनिवारी आपल्या निवडणूक अभियानास सुरुवात केली आहे.
श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी कमी करण्याचा व अमेरिकन जनतेला सुरक्षित वाटेल असे प्रशासन देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी अभियानाची सुरुवात करताना सांगितले. रुझवेल्ट बेटावर आयोजित निवडणूक प्रचारसभेत जवळपास साडेपाच हजार उपस्थितांना त्या संबोधित करीत होत्या. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी जनतेला दिले आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ काही लोकांची प्रगती हा नाही. अब्जाधीश आणि श्रीमंतांची प्रगती म्हणजे समृद्धी असा होत नाही. तुमची सर्वांची प्रगती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा देश प्रगती करू शकणार नाही आणि या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याच्या उद्देशाने मी या निवडणुकीत उभी आहे, असे हिलरी यावेळी म्हणाल्या.
हिलरी यांचे पती व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिटं, मुलगी चेलेसा आणि जावई हेदेखील यांनीदेखील या पहिल्या सभेला हजेरी लावली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी भलेही सर्वात तरुण उमेदवार नसेल, पण सर्वात तरुण महिला अध्यक्ष नक्कीच असेन. एवढेच नव्हे तर या पदासाठी उभी असलेली पहिली आजीदेखील आहे, असे त्या म्हणाल्या. जागतिक दहशतवादावरही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22922

Posted by on Jun 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1623 of 2458 articles)


=भारतीय टपाल विभागाचा पुढाकार= नवी दिल्ली, [१४ जून] - आपल्या बचत खातेधारकांना आगामी दोन महिन्यात वैयक्तिक डेबिट कार्ड देण्याच्या दिशेने ...

×