Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » हिलरी-ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत

हिलरी-ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत

donald_trump_hillary_clintonवॉशिंग्टन, [२ मार्च] – अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिटंन यांच्यात तुल्यबळ लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कट्टरवादी मते मांडल्यामुळे अनेकांच्या टीकेचा सामना करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘सुपर ट्युस्डे’ला अनेक राज्यांमध्ये झालेल्या मतदानात विजय मिळविल्यामुळे ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या अगदी जवळ पोचले आहेत. ट्रम्प यांनी अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसाच्युसेट्‌स, टेन्नीसी, व्हर्मोण्ट आणि व्हिर्जिनिया या सात राज्यांमध्ये विजय मिळविला.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असलेल्या आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्यास उत्सुक असलेल्या ६८ वर्षी हिलरी क्लिटंन यांनीही अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसाच्युसेट्‌स, टेन्नीसी, टेक्सास आणि व्हिर्जिनिया या सात राज्यांमध्ये विजय संपादन केला. परंतु, अनेक राजकीय पंडितांनी भाकीत केल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प किंवा हिलरी क्लिटंन या दोघांपैकी कोणालाही क्लीन स्वीप करता आले नाही.
शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे आणखी एक उमेदवार टेड क्रुक यांनी सुपर ट्युस्डेमध्ये टेक्सास येथे सर्वात मोठा विजय मिळविला. याशिवाय ओक्लाहोमा व अलास्का येथेही ते विजयी झाले, तर मार्को रुबियो यांनी मिन्नेसोटा येथे विजय मिळविला. रुबियो यांचा २०१६ मधील हा पहिला विजय आहे. हिलरी क्लिटंन यांचे डेमॉक्रॅटिक पक्षाचे मुख्य प्रतिस्पर्धी बेर्नी सॅण्डर्स यांनी कोलारॅडो, ओक्लाहोमा, मिन्नेसोटा आणि व्हर्मोण्ट या आपल्या गृहराज्यात विजय मिळवला.
एकदा ही मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मी एकाच व्यक्तीच्या मागावर राहणार असून, त्या हिलरी क्लिटंन असतील, अशी घोषणा ट्रम्प यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26993

Posted by on Mar 3 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (782 of 2458 articles)


=इशरत जहॉं प्रकरण, भूमिका स्पष्ट करण्याची भाजपाची मागणी= नवी दिल्ली, [२ मार्च] - इशरत जहॉंवरील शपथपत्रात बदल करण्यात कॉंगे्रस अध्यक्ष ...

×