Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » हिवाळी अधिवेशन लवकर बोलावणार : नायडू

हिवाळी अधिवेशन लवकर बोलावणार : नायडू

=जीएसटीचा तिढा=
Venkaiah-Naidu2नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – कॉंग्रेस पक्षाच्या आठमुठ्या धोरणामुळे वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हे आर्थिक सुधारणेसाठीचे महत्त्वाचे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारित होऊ शकले नाही. मात्र, हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकर बोलावले जाण्याची शक्यता आहे, असे संकेत संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज गुरुवारी दिले.
अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जीएसटी विधेयक पारित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. १ एप्रिल २०१६ पासून देशात जीएसटी लागू करण्याचा सरकारचा निर्धार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक आटोपताच संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले जाऊ शकते, असे सांगतानाच कॉंग्रेसने नकारात्मक राजकारणाचा त्याग करावा, असे आवाहन नायडू यांनी केले. साधारणपणे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू होते.
जीएसटीसारखे अत्यंत महत्त्वाचे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे संस्थगित करण्यात आलेले पावसाळी अधिवेशन पुन्हा बोलावता आले नसल्याने मी खूप निराश आहे. जीएसटी ही काळाची गरज आहे. मात्र, मी अजूनही आशावादी आहे, असे नायडू म्हणाले. १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करण्याच्या दृष्टीने बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ नोव्हेंबरला लागल्यानंतर लगेचच संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले जाऊ शकते, असे नायडू म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23747

Posted by on Sep 11 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1491 of 2453 articles)


पाच टप्प्यात होणार मतदान, आचारसंहिता लागू ८ नोव्हेंबरला मतमोजणी नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार ...

×