Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » हेडलीला काश्मिरात लढायचे होते

हेडलीला काश्मिरात लढायचे होते

=उज्ज्वल निकम यांची माहिती=
Ujjwal-Nikamमुंबई, ८ [फेब्रुवारी] – लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीला जम्मू-काश्मिरात सक्रिय होऊन भारतीय लष्कराविरोधात लढायचे होते. पण, तोयबाचा कमांडर झकिऊर रेहमान लखवीने वयाचा विचार करून त्याला परवानगी नाकारली आणि तुला यापेक्षाही मोठी धाडसी कामगिरी पार पाडायची आहे, असे सांगितले.
हेडलीने दिलेल्या कबुलीजबाबाची सविस्तर माहिती देताना, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना सांगितले की, काश्मिरात लष्करी जवानांना ठार मारण्यासाठी तो अतिशय उत्सुक होता. पण, त्याचे वय युद्धात सहभागी होण्याचे नसल्याचे लखवी म्हणाला.
उद्या मंगळवारी त्याला अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न विचारण्यात येणार आहे. या प्रश्‍नाचे उत्तर भारतासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सोमवारी त्याने जे काही कबुल केले, त्यावर मी पूर्णपणे समाधानी आहे. त्याने अतिशय संवेदनशील माहिती उघड केली आहे. हाफिझ सईदला भेटल्याचे मान्य करताना, त्याचे छायाचित्रही त्याने प्रथमक्षणी पाहताच ओळखले, असेही निकम यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26793

Posted by on Feb 9 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (840 of 2452 articles)


=इंटरनेट कंपन्यांना धक्का= नवीदिल्ली, [८ फेब्रुवारी] - नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन करीत भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने इंटरनेट कंपन्यांना विविध ...

×