Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हेरगिरी घोटाळा दहा हजार कोटींचा

हेरगिरी घोटाळा दहा हजार कोटींचा

=आयबी, गृहमंत्रालयाची होती नजर=
Intelligence-Bureau-ibनवी दिल्ली, [२१ फेब्रुवारी] – पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरण हे आजचे नसून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा एकप्रकारचा मोठा घोटाळाच आहे आणि तो किमान दहा हजार कोटींच्या घरात आहे, असा दावा या प्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी आणि माजी पत्रकार शंतनू सैकियाने केला आहे. तर, आयबी आणि गृहमंत्रालयाची या हेरगिरी प्रकरणावर गेल्या सहा महिन्यांपासून बारीक नजर होती. विशेषत: आयबीमुळेच या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे, असे गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने म्हटले आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहेत.
गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सैकिया म्हणाला की, हा हेरगिरी घोटाळा सुमारे दहा हजार कोटींच्या घरात आहे. तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यानेच मला त्यात अडकविण्यात आले आहे. तर, आपले पाप लपविण्यासाठीच तो असे बोलत असल्याचा दावा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. कार्पोरेट हेरगिरी घोटाळ्यातील तपासाला गती देताना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी नोएडातील पेट्रोकेमिकल कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. शुक्रवारी अटक करण्यात आलेला एनर्जी सल्लागार प्रयास जैनचे हे कार्यालय आहे. यानंतर पोलिसांचे पथक जैन व ज्युबिलंट एनर्जीचा वरिष्ठ अधिकारी सुभाष चंद्रला घेऊन ज्युबिलंटच्या नोएडातील कार्यालयात आले. अनेक महत्त्वाची कागदपत्रे या धाडीत ताब्यात घेण्यात आली आहेत.
आम्हाला या हेरगिरी प्रकरणाच्या तळापर्यंत जायचे आहे. आणखीही काही कार्यालयांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे.
शुक्रवारी रात्री अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमंडळ कामकाज विभागाचे व्यवस्थापक शैलेश सक्सेना, एस्सारचे उपमहाव्यवस्थापक विनय कुमार, केर्न्स इंडियाचे महाव्यवस्थापक के. के. नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी सुभाष चंद्र आणि अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे उपमहाव्यवस्थापक ऋषी आनंद यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा : पोलिस
दरम्यान, पाच बड्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांजवळून जे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत, ते सर्व राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असून, यात राष्ट्रीय हित पणाला लागले असल्याची माहिती पोलिसांनी आज शनिवारी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाला दिली. या आरोपींविरुद्ध शासकीय गोपनीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20822

Posted by on Feb 22 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2026 of 2453 articles)


=हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार= कोल्हापूर, [२१ फेब्रुवारी] - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, डाव्या चळवळीचे अध्वर्यू गोविंदराव पानसरे यांना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी ...

×