Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » हे साहित्यिक की राजकारणी?

हे साहित्यिक की राजकारणी?

=पुरस्कार परत करणार्‍यांना साहित्यिकांचा सवाल=
sahitya-akademi-award-returnedनवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – साहित्य अकादमीतील पदांचा राजीनामा देण्यास पुरस्कार परत करणारे स्वयंघोषित साहित्यिक साहित्य अकादमीचा अपमान करीत असून, सोबतच साहित्याचाही अपमान करीत आहेत. यांचे साहित्याशी काहीही देणेघेणे नसून अकादमीतील आपली एकाधिकाशाही संपुष्टात येण्याच्या भीतीनेच त्यांनी हे असले उद्योग सुरू केले आहेत, अशा घणाघाती शब्दांत भारतातील साहित्यिकांनी पुरस्कार परत करणार्‍या लेखकांवर हल्ला चढविला.
जे स्वत: साहित्य अकादमीचे कर्तेधर्ते बनले होते आणि आपल्याच लोकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार वाटत होते, ते आज स्वत:च साहित्य अकादमीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत, ही बाब समजण्यापलीकडची असल्याचेही या साहित्यिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सर्वांना याचा अधिकार तरी आहे का, असा सवालही या लेखकांनी उपस्थित केला आहे.
साहित्यनिर्मितीसाठी एक साहित्यिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यामुळे पुरस्कार परत करणे साहित्याशी प्रतारणा असून, रसिकांचा अपमान आहे. पुरस्कार परत करणारे साहित्यिक पुरस्काराची रक्कमही परत करणार का, असा सवालही या लेखकांनी विचारला आहे.
देशावर जेव्हा आणीबाणी लादण्यात येऊन शेकडो साहित्यिकांना तुरुंगात डांबण्यात आले तेव्हा या तथाकथित स्वयंघोषित साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याबाबत चकार शब्दही काढला नाही, कारण त्यांची कृष्णकृत्ये बिनधास्त सुरूच होती व सरकारकडून त्यांना मलाई चाखायला मिळत होती, अशा शब्दात या साहित्यिकांनी राजीनामा देणार्‍या लेखकांचे वाभाडे काढले.
साहित्य अकादमीवर वर्षानुवर्षे विशिष्ट विचारसरणी असलेल्या लेखक-साहित्यिकांचेच वर्चस्व आहे. असंख्य लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यिकांची या लोकांनी उपेक्षा केली आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल बडविणारे तेव्हा कुठे गेले होते, असा रोखठोक सवालही या साहित्यिकांनी विचारला आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीनचे शिर कापून आणणार्‍याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा हे साहित्यिक कुठे दडून बसले होते. गोध्रा येथे निरपराध हिंदू कारसेवकांना रेल्वेबोगीत बंद करून जिवंत जाळण्यात आले, तेव्हा यांचा आत्मा का दुखावला नाही. नंतरच्या घटनांवर यांनी आवर्जून टीका केली आणि वर्षानुवर्षे ते याच विषयावर गळा काढत आहेत. मात्र, काश्मिरात असंख्य निरपराध लोकांना ठार मारण्यात आले तेव्हा यांनी तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही, अशा शब्दात राजीनामे देणार्‍या या साहित्यिकांवर या नामवंतांनी टीका केली. या तथाकथित स्वयंघोषित साहित्यिकांच्या राजीनामा देण्याच्या कृतीचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो, असेही या लेखकांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डॉ. त्रिभुवननाथ शुक्ल (जबलपूर), डॉ. एन. सुंदरम् (चेन्नई), डॉ. मिथिलाप्रसाद त्रिपाठी (इंदूर), डॉ. कमलकिशोर गोयनका (दिल्ली), डॉ. शत्रुघ्नप्रसाद (पाटणा), डॉ. सुदीप बासू (शांतिनिकेतन), डॉ. हृदयनाथ दीक्षित (लखनौ), डॉ. बलवंत जानी (राजकोट), डॉ. बिनू पट्टियाविल (थिरुवनंतपुरम), डॉ. शौरी राजन (चेन्नई), डॉ. नरेंद्र कोहली (दिल्ली), डॉ. शेषारत्नम्, डॉ. देवेंद्र दीपक (भोपाळ), डॉ. नंदकिशोर पांडेय (आग्रा), डॉ. नागेंद्रनाथ प्रधान (ओडिशा), डॉ. देवेंद्रचंद्र दास (गोहाटी), डॉ. जयगोपाल कोछड (मोहाली), डॉ. चंद्रशेखर भंडारी (बंगळुरू), डॉ. एम. शेषन (चेन्नई), डॉ. ललिताम्बा (बंगळुरू) यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25139

Posted by on Oct 15 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1336 of 2453 articles)


लंडनच्या पाक्षिकाने केली निवड अर्थव्यवस्था बळकट करण्याचे श्रेय मोदींना नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] - लंडनमधील एका पाक्षिकाने केंद्रीय अर्थमंत्री ...

×