Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » होय, अफजलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या

होय, अफजलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या

=उमर खालिदची कबुली=
umar khalid, dcp bassiनवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ नोव्हेंबर रोजी आयोजित समारंभात आम्ही संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेला अतिरेकी अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या, अशी स्पष्ट कबुली या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी उमर खालिद याने दिल्ली पोलिसांना चौकशीत दिली.
उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य हे दोघेही मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना शरण आले होते. त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा जेएनयूमध्ये अफजलच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, असे दोघांनीही कबूल केले, अशी माहिती तपास अधिकार्‍याने दिली.
दरम्यान, खालिद आणि अनिर्बान शरण आल्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि छायाचित्रकारांनी धाव घेतली. त्यांना टाळण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही तब्बल १० किलोमीटर अंतर फिरवून आर. के. पुरम पोलिस ठाण्यात आणले होते. जेएनयूपासून हे पोलिस ठाणे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=26872

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (817 of 2452 articles)


=भाजपाध्यक्ष अमित शाहंचा राहुल गांधींना सवाल= बहराईच, [२४ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही प्रकाराचे समर्थन करून, त्याचे राजकीय भांडवल ...

×