Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » होय, दाऊद कराचीतच राहतो

होय, दाऊद कराचीतच राहतो

=अली जावेद यांचा पाकला घरचा अहेर=
Ali Javed PWAनवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आपल्या देशात नाही, असा दावा करणार्‍या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे सरचिटणीस अली जावेद यांनी दाऊद पाकच्या कराची शहरातच राहत असून, मी त्याचे घरही पाहिले असल्याचा दावा केला आहे.
राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जावेद म्हणाले की, माझे काका पाकिस्तानी लष्करात मेजर होते. ते कराचीतील उच्चभ्र समजल्या जाणार्‍या क्लिफ्टन भागात राहत होते. त्यांच्या घराच्या शेजारीच दाऊद इब्राहिमचे घर होते आणि मी त्याचे घर पाहिले आहे. तुम्ही कधी दाऊदला भेटला आहात का, असे जेव्हा मी काकांना विचारले तेव्हा, दाऊद लॉनवर फिरायला यायचा तेव्हा दुरूनच आम्ही एकमेकांना हात दाखवत असू, असे काका मला सांगायचे.
अली जावेद यांनी यावेळी कॉंग्रेसवरही टीका केली. कॉंग्रेस पक्ष गांधी आणि नेहरू यांच्या विचारांपासून खूप दूर गेला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी आणि नेहरूंचे विचार वाचले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25682

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1170 of 2453 articles)


मुंबई, [२३ नोव्हेंबर] - ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना नाटक, चित्रपट व संगीत क्षेत्रातील आपल्या चतुरस्त्र कामगिरीबाबत दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने ...

×