Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ॐ उच्चाराने प्राणवायू मिळतो

ॐ उच्चाराने प्राणवायू मिळतो

=सलमा अन्सारी यांची भूमिका=
Salma Ansariनवी दिल्ली, [२३ मे] – २१ जून रोजी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनी ॐ शब्दाचा उच्चार करावा, असे मत आयुष मंत्रालयाने व्यक्त केल्यानंतर वादळ उठले असतानाच, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी ॐ उच्चारातून आपल्याला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू मिळतो. त्यामुळे ॐ चा उच्चार करण्यात काहीच गैर नाही, असे रोखठोक मत व्यक्त केले आहे.
या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ॐ चा उच्चार करणे बंधनकारक नसल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
सलमा अन्सारी म्हणाल्या की, मी आयुष्यभर योगा करीत आले आहे. ॐ च्या उच्चाराने प्राणवायू मिळतो. जर योगा केला नसता, तर शरीरातील हाडे ठिसूळ झाली असती. तुम्ही सुशिक्षित असाल, तर ज्या गोष्टीतून फायदा मिळतो, ती गोष्ट तुम्ही करायलाच हवी, असे मला वाटते.
तुम्ही अल्ला, गॉड किंवा रब म्हणत नाही का, त्यात काय फरक आहे, ॐ म्हणण्यात काहीही गैर नाही. सर्वांनी योग करायला पाहिजे ॐ च्या उच्चारामुळे आरोग्य सुधारते, त्यामुळे योगाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28458

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (281 of 2453 articles)


=२८ मंत्र्यांसह घेतली शपथ, १५ जुने, १३ नवे चेहरे= चेन्नई, [२३ मे] - अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी आज सोमवारी तामिळनाडूच्या ...

×