Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार : मुनगंटीवार

१० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार : मुनगंटीवार

sudhir-mungantiwar1अलिबाग, [२२ जून] – राज्यातील ८९ हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे दिली.
अलिबाग येथील तीन दिवसीय शिक्षण परिषदेत बुधवारी वित्त व वनमंत्री मनुगंटीवार यांनी हजेरी लावली, तसेच राज्यात १ जुलै रोजी होणार्‍या दोन कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सर्वांना वृक्ष लागवडीत आणि वृक्ष जगवण्याच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे उपनगराध्यक्ष महेश बाल्टी यांच्यासह परिषदेस शिक्षण विभागाचे सर्व संचालक, उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
चांगल्या शिक्षणातून चांगला समाज घडतो, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, पूर्वी गुरुकुल पद्धतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जायचे. हे गुरुकुल वनांमध्ये असायचे. आता शाळांमध्ये झाडे लावून आपण शाळेचा परिसर हिरवागार करूया. सृष्टीचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष लावून ते जगवूया. शिक्षण परिषदेनेही या विषयावर चिंतन करावे. सामूहिक चिंतन केल्याशिवाय आपण अपूर्णांकातून पूर्णांकाकडे जाऊ शकत नाही. जगातील ४५ संस्कृतींपैकी ४४ संस्कृती काळाच्या प्रवाहात नामशेष झाल्या, एकच भारतीय संस्कृती मौखिक परंपरेने आणि प्रसाराने टिकली, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध असतील किंवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असतील, या सर्व ज्ञानी लोकांना वृक्षाखालीच ज्ञान प्राप्त झाले आहे. वनविभागाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. हे वृक्षधनुष्य पेलण्यासाठी शासनासोबत मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आवश्यक आहे. विद्यार्थी या देशाचे उज्वल भविष्य आहे. त्यांच्या मनात वृक्षारोपणाचे बिजारोपण करून हरित महाराष्ट्र घडवण्याच्या कामात शिक्षण विभागाची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आताचे राज्याचे २० टक्के असलेले वनक्षेत्र आपल्याला ३३ टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे, असे सांगताना यावर्षी म्हणजे २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये तीन कोटी, २०१८ मध्ये १० कोटी आणि २०१९ मध्ये २५ कोटी असे मिळून चार वर्षांत ३८ कोटी व ग्रामपंचायतींच्या जागांमध्ये १२ कोटी असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचा वन विभागाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28723

Posted by on Jun 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (196 of 2451 articles)


=भारताच्या सदस्यत्वावर पाकचा कांगावा= इस्लामाबाद, [२२ जून] - अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा देणे म्हणजे, चीनचे पंख ...

×