Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ११४२ स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द

११४२ स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द

=कर नियमांचे उल्लंघन, गृहमंत्रालयाची कारवाई=
home_ministryनवी दिल्ली, [१८ मार्च] – वार्षिक आयकर विवरण सादर न करता करविषयक नियमांचे उल्लंघन करून विदेशातून निधी स्वीकारणार्‍या स्वयंसेवी संस्थांविरोधात कठोर कारवाई करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा ११४२ संस्था आणि संघटनांचे विदेशी योगदान नियमन कायद्याचे परवाने रद्द केले आहेत. यात ओस्मानिया विद्यापीठ, आंध्रप्रदेश विद्यापीठ, विशाखापट्टनम् येथील आंध्र विद्यापीठ आणि ख्रिश्‍चनांच्या काही स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांचे परवाने रद्द करणारा आदेश अलीकडेेच जारी केला असून, यामुळे या संस्था व संघटनांना विदेशी निधी स्वीकारता येणार नाही, असे मंत्रालयातील सूत्राने सांगितले. या संस्थांसोबतच मंत्रालयाने हैदराबाद येथील अपोलो कॅन्सर हॉस्पिटलच्या कॅन्सर केअर युनिट रिसर्च ऍण्ड एड्युकेशनल फाऊंडेशनचा परवानाही रद्द केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
२००९ ते २०१२ या कालावधीत विदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत या सर्व संस्थांनी आपले वार्षिक आयकर विवरण केंद्र सरकारकडे सादर केले नाही. गेल्या वर्षी मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस जारी केल्यानंतरही त्यांनी कुठलेच उत्तर सादर केले नाही. यामुळे या ११४२ संस्था व संघटनांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याचे गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.
गेल्या वर्षी मंत्रालयाने देशभरातील १०,३३१ स्वयंसेवी संस्था आणि इतर संघटनांना कारणे दाखवा नोटिसा जारी करून, त्यांचे परवाने रद्द का केले जाऊ नये, अशी विचारणा केली होती. यातील २९९ संस्था व संघटनांनी आपले उत्तर सादर केले असून, मंत्रालय त्यावर अभ्यास करीत आहे, असे या वृत्तात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21583

Posted by on Mar 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1878 of 2453 articles)


=२५०० हरविलेल्या मुलांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य= नवी दिल्ली, [१८ मार्च] - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या ‘ऑपरेशन स्माईल’ ...

×