|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.02° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 62 %

वायू वेग : 4.01 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.81°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.9°C - 31.07°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.34°C - 31.49°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.53°C - 32.83°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.1°C - 32.6°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.64°C - 31.99°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १३ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

१३ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

=अतुलचंद्र कुलकर्णी दहशतवाद विरोधी पथकाचे नवे एडीजी=
FADNAVIS_DEVENDRA1मुंबई, [१३ मे] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या असून, मुंबई पोलिस विभागातील गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी (एडीजी) नियुक्ती देण्यात आली आहे. या पदावर असलेले अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक के. एल. बिष्णोई यांची महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अप्पर पोलिस महासंचालक आणि महाव्यवस्थापक पदावर पाठविण्यात आले असून, म्हाडा विभागाचे मुख्य दक्षता अधिकारी हेमंत नगराळे यांना नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी तर नियोजन व संनियंत्रण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक राजेंद्रसिंग यांना अप्पर पोलिस महासंचालक म्हणून सामुग्री व तरतूद विभागात पाठविण्यात आले आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयातील प्रशासन विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन यांना नियोजन आणि संनियंत्रण विभागात तर सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी पदी प्रज्ञा सरोदे यांना अप्पर पोलिस महासंचालक प्रशासन महासंचालक कार्यालय येथे पाठविण्यात आले आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलिस महानिरीक्षक के. के. सारंगल यांची अप्पर पोलिस महासंचालकपदावर पदोन्नती करून विक्रीकर विभागाच्या मुख्य दक्षता अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली असून, या पदावर असलेले विनय कोरेगावकर यांना अप्पर पोलिस महासंचालक पदावर पदोन्नती देत सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.
कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महासंचालक एस. के. वर्मा यांची अप्पर पोलिस महासंचालकपदी पदोन्नती करून म्हाडाच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावर पदस्थापना केली आहे. विशेष पोलिस महासंचालक बी. के. सिंग यांना अप्पर पोलिस महासंचालकपदावर पदोन्नती देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली केली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक व्ही. डी. मिश्रा यांना पोलिस महासंचालक पदावर पदोन्नती देत महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण विभागाच्या महासंचालक पदी नियुक्ती केली असून, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त प्रभात रंजन यांची महासंचालक विधि व तंत्रज्ञान विभाग येथे नियुक्ती केली आहे.

Posted by : | on : 14 May 2016
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g