Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » १४० जागांसह रालोआला स्पष्ट बहुमत मिळेल

१४० जागांसह रालोआला स्पष्ट बहुमत मिळेल

  • बिहारचे आणखी एक सर्वेक्षण
  • महाआघाडी ७० जागांवरच थांबणार

bihar-mapनवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआला १४० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज आणखी एका वृत्तवाहिनीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. २४३ सदस्यीय विधानसभेत जदयु-राजद-कॉंगे्रस महाआघाडीला केवळ ७० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.
या निवडणुकीत रालोआला ५०.८ टक्के आणि महाआघाडीला ४२.५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील ४१.२ टक्के मुस्लिम रालोआला मतदान करतील. शिवाय, मोठ्या संख्येत असलेल्या यादव समाजाची मतेही महाआघाडीच्या तुलनेत रालोआलाच जास्त मिळतील, असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
रालोआ हीच खरी धर्मनिरपेक्ष आघाडी आहे, असा यादव आणि मुस्लिम समाजाचा ठाम विश्‍वास आहे. बिहारमध्ये परिवर्तन व्हावे, असे बहुतांश लोकांना वाटते. या सर्वेक्षणानुसार रालोआला १४०, महाआघाडीला ७० जागा मिळतील. तर, ३३ जागांवर काट्याची लढत होईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23919

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1439 of 2452 articles)


=स्मृती इराणी यांची माहिती= आगरतळा, [१९ सप्टेंबर] - राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी समाजाच्या तळागळातील नागरिकांचे मत विचारात घेण्याची प्रक्रिया ...

×