Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » १५ वर्षीय जान्हवीचे कन्हैयाला खुल्या चर्चेचे आव्हान

१५ वर्षीय जान्हवीचे कन्हैयाला खुल्या चर्चेचे आव्हान

janhavi behalनवी दिल्ली, [६ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांवरून उद्‌भवलेल्या वादाचे पडसाद अजूनही कायम असताना आणि कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घोषणाबाजी करणार्‍यांचे समर्थन केले असताना, लुधियानाच्या १५ वर्षीय जान्हवी बेहलने विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला या मुद्यावर चर्चेचे खुले आव्हान दिले आहे.
कन्हैयाकुमार जिथे आणि जेव्हा सांगेल, तिथे जाऊन त्याच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असे जान्हवीने स्पष्ट केले. आपल्या घरात किंवा विद्यापीठ परिसरात मित्रांसोबत बसून एखाद्यावर टीका करणे फार सोपे आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कन्हैयाने टीका केली, त्या मोदींप्रमाणे एकाग्र होऊन काम करण्याची क्षमता कन्हैयाने आधी निर्माण करावी, अशी चपराकही जान्हवीने हाणली.
पंतप्रधान मोदी यांच्याबाबत कन्हैया जे काही बरळला, ते चुकीचे आणि निराधार आहे. अशा प्रकारचे वक्तव्य कदापि मान्य करता येणार नाही. मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्याने जर देशविरोधी घोषणा देणार्‍यांविरोधात टीका केली असती, तर चांगले झाले असते, असेही तिने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सामाजिक कार्यासाठी जान्हवीला पंतप्रधान मोदी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27077

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (747 of 2452 articles)


=प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन, सुप्रीम कोर्टातही याचिका= ढाका, [६ मार्च] - हिंदूंसह इतर धर्मातील अल्पसंख्यक नागरिकांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर, राजधर्म ...

×