Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » १,७४१ कायदे मोडीत काढा

१,७४१ कायदे मोडीत काढा

=समितीची शिफारस=
law booksनवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] – पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेल्या एका विशेष समितीने कालबाह्य ठरलेले १,७४१ कायदे मोडीत काढण्याची शिफारस केली आहे.
बदलत्या सामाजिक स्थितीत या जुनाट कायद्यांचा काहीही उपयोग नसल्याचे समितीने सुचविले आहे. याशिवाय, १५० केंद्रीय कायद्यांमध्ये दुरुस्ती करून त्यांचे रूपांतर सर्वसमावेशक आणि निवडक २१ कायद्यांमध्ये करण्यात यावे, असेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे, कायद्यांची संख्या मर्यादित ठेवता येईल. १८६७ चा प्रेस ऍण्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स हा कायदा आवश्यक दुरुस्त्यांसह अंमलात आणता येईल, अशी शिफारस या समितीने केली आहे. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी स्टेट्‌स बुकमध्ये एकूण २,७८१ केंद्रीय कायद्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे माजी सचिव आर. रामानुजम यांच्या अध्यक्षतेत या विशेष समितीची स्थापना केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20219

Posted by on Feb 2 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2135 of 2453 articles)


=पाकच्या संबंधाचे अमेरिकेने दिले भारताला पुरावे= नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] - भारतातील अमेरिकन आणि इस्रायल वकिलातींवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी ...

×