Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » १८ वर्षांचे होताच मतदार ओळखपत्र घरपोच

१८ वर्षांचे होताच मतदार ओळखपत्र घरपोच

VOTING-ID-CARDनवी दिल्ली, [२ मार्च] – तरुण पिढीत मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मतदार ओळखपत्र तयार करण्यात येणार्‍या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करताच, नवमतदारांच्या घरीच ओळखपत्र पाठविण्याची योजना आयोगाने तयार केली आहे.
मुलगा असो की मुलगी, त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याची किंवा तिची लगेच मतदारयादीत नोंद केली जाईल. तसेच आपले मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी त्याला किंवा तिला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात किंवा मतदान केंद्रावर रांग लावण्याची गरज राहणार नाही. आयोगातील एका वरिष्ठ अधिकार्‍यानेच या योजनेची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत दिली आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदाराला मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. आधार कार्डच्या माध्यमातूनच त्याचे नाव मतदार यादीत टाकले जाईल. आधार कार्डमध्ये प्रत्येकाची जन्मतारीख असल्याने, मतदाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केली की नाही, हे तपासण्यासाठी आधारकार्डाचाच आधार घेण्यात येईल. याच अनुषंगाने आयोगाने अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे हा अधिकारी म्हणाला. आधार कार्डवरील माहिती बदलली असल्यास ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून त्यात आवश्यक दुरुस्ती करणेही सोपे होणार आहे. यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांना या योजनेचा मोठा फायदा मिळणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21020

Posted by on Mar 3 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1992 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१ मार्च] - सध्या भारताचे फ्रान्समधील राजदूत असलेले अरुणसिंह यांची अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ...

×