Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » १९४७ पासून मुस्लिम दुरावलेलेच

१९४७ पासून मुस्लिम दुरावलेलेच

=कॉंगे्रसची धोरणेच जबाबदार : नजमा हेपतुल्ला=
najma_heptullahनवी दिल्ली, [२४ मे] – केंद्रात भाजपा सरकार आहे म्हणून देशातील मुस्लिमांच्या मनात दुरावल्याची भावना आहे, हा युक्तिवाद पूर्णपणे निराधार आहे. १९४७ पासूनच हा स्वत:ला दुरावलेला समजत आहे आणि त्यासाठी ६० वर्षे देशावर राज्य करणार्‍या कॉंगे्रसची ध्येयधोरणेच प्रामुख्याने जबाबदार आहेत, असा स्पष्ट आरोप अल्पसंख्यक कामकाज मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी केला आहे.
आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याने मुस्लिम समाज हा सरकारच्या स्वाधीन राहिला आहे. केंद्रात सत्तेवर आलेल्या प्रत्येक कॉंगे्रस सरकारने नेमका याच संधीचा फायदा घेतला आणि या समाजाचा विकास न करता केवळ गठ्ठा मतांकरिता त्यांचा वापर केला. विकासाअभावी मुस्लिम समाजाच्या मनात कायमच दुरावल्याची भावना घर करून राहिली आहे. ही भावना आजची नाही आणि भाजपा सरकारमुळेही नाही. तर देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच अर्थातच १९४७ पासूनच ही भावना कायम चालत आलेली आहे असे त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. भाजपाच्या काही नेत्यांनी दिलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे मुस्लिमांच्या मनात असुरक्षितता आणि भीती निर्माण झाली आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता.
मुस्लिम समाज आधीपासूनच आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यात सामाजिक मागासलेपणाचीही भर पडली आणि हेच त्यांच्या मनातील असुरक्षिततेचे मुख्य कारण आहे. आजवरच्या कॉंग्रेस सरकारांनी या समाजाचा वापर केवळ मतांसाठीच केला आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हिंदुत्ववादी संघटनांकडून आम्हीच तुमचे रक्षण करू शकतो, असे सांगून कॉंगे्रसने या समाजाला नेहमीच भीतीयुक्त वातावरणात ठेवले होते. पण, एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने ठोस धोरणे आणि कार्यक्रम राबवून या समाजाच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण केला आहे, असा दावा हेपतुल्ला यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22673

Posted by on May 25 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1665 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२४ मे] - अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेवर येऊन आज रविवारी शंभर दिवस पूर्ण ...

×