Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » १ ऑगस्टपासून सातवा वेतन आयोगाचा पगार

१ ऑगस्टपासून सातवा वेतन आयोगाचा पगार

=केंद्रीय कर्मचार्‍यांना खुशखबर=
Salary_hikeनवी दिल्ली, [१५ जून] – केंद्र सरकारच्या विद्यमान ४७ लाख कर्मचार्‍यांसाठी आणि सुमारे ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी खुशखबर आहे. या सर्वच कर्मचार्‍यांना येत्या १ ऑगस्टपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, याच काळात किमान सहा महिन्यांची थकबाकीही त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ ऑगस्टपासून अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित उच्चस्तरीय सूत्राने दिली. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर २०१६-१७ या आर्थिक वर्षांत १.०२ लाख कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. यातील २८,४५० कोटी रुपये केवळ रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च होणार आहेत. केंद्र सरकारच्या ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही याचा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या आठवडयात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा विचार करण्यासाठी सचिवांची विशेष समिती नियुक्त केली होती. समितीने आयोगाच्या शिफारसी अंमलात आणण्यावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते.
२०१५-१६ या आर्थिक वर्षांत केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनावर ६०,७३१ कोटी रुपये; तर भत्त्यांवर ८४,४३७ कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते. आयोगाने सुचविल्याप्रमाणे या दोन्हीतील वाढ एकाच वेळी देणे सध्या तरी केंद्राला परवडणार नाही. त्यामुळे १ ऑगस्टपासून त्या लागू होण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत आहेत..

Short URL: https://vrittabharati.in/?p=28613

Posted by on Jun 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (232 of 2453 articles)


=... तर मिळाला असता जागतिक भागीदारीचा दर्जा= वॉशिंग्टन, [१५ जून] - भारताला अमेरिकेचा जागतिक धोरणात्मक आणि संरक्षण भागीदार म्हणून मान्यता ...

×