Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » १ जूनला धडकणार केरळात मान्सून

१ जूनला धडकणार केरळात मान्सून

=हवामान खात्याच्या अधिकार्‍याची माहिती=
MANSOON-OPEDCLOUDनवी दिल्ली, [१० मे] – रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी ज्याची आपण आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत, त्या नैऋत्य मान्सूनचे यावर्षी १ जून रोजी केरळात आगमन झालेले असेल. अर्थातच मान्सून यावेळी निर्धारित वेळेतच केरळच्या सीमेवर धडकणार आहे. तथापि, यंदाचा मान्सून साधारण राहील, असे भाकीत भारतीय हवामान खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने केले आहे.
देशातील ५८० जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस काही प्रमाणात कमी राहणार आहे. याबाबतची कल्पना असलेल्या केंद्र सरकारने ही तूट भरून काढण्यासाठी आपातकालीन योजना तयार केली आहे. दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचा फायदा घ्यावा, यासाठी सरकार त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. संपूर्ण देशभरातच मान्सूनचा पाऊस साधारण राहील. या अंदाजात दोन ते तीन टक्के त्रूटी राहू शकेल. अल-निनो हा घटक सक्रिय असल्याने त्याचा परिणामही मान्सूनवर पडण्याची शक्यता आहे, असे या अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी खाजगीत बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी निर्धारित वेळेतच मान्सूनचे आगमन झाले असतानाही, नंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणि अल-निनोच्या प्रभावामुळे देशात १२ टक्के कमी पाऊस पडला होता. याचा मोठा फटका अन्नधान्य, कापूस आणि बी-बियाणे यासारख्या पिकांना बसला होता. मान्सूनने शेतकर्‍यांना निराश केल्यानंतर यावर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतकर्‍यांवर आघात केला. मोठ्या परिश्रमाने शेतात पिकविलेली पिके या अवकाळी पावसाने जवळजवळ नष्ट केली. याचा परिणाम असंख्य शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळण्यात झाला.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि भारताची अर्थव्यवस्था कृषीवरच आधारित असल्याने नैऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन होणे आणि तो समाधानकारक पडणे अतिशय आवश्यक आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22476

Posted by on May 10 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1714 of 2453 articles)


=तुमच्यातही मानवता आहे, नक्कीच बदलाल : दंतेवाडा जिल्ह्यात पंतप्रधानांचे प्रतिपादन= दंतेवाडा, [९ मे] - खांद्यावर नांगर घेऊनच कोणत्याही समस्येवर तोडगा ...

×