Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » १ मे नंतर महाराष्ट्रात आयपीएल नाही: सुप्रीम कोर्ट

१ मे नंतर महाराष्ट्रात आयपीएल नाही: सुप्रीम कोर्ट

supreme_court_1नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे १ मेनंतरचे कोणतेही सामने महाराष्ट्रात होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळवायला मनाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने २२ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. ती याचिका आज बुधवारी फेटाळण्यात आली. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत १ मेनंतर राज्यात सामने खेळू देण्यास नकार दिला. न्यायमुर्ती दीपक मिश्रा आणि न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या पीठाने ही याचिका फेटाळली.
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल नंतरचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळले जातील असा निर्णय दिला असला तरी १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली. कारण एका दिवसात विशाखापट्‌टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मे चा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने परवानगी दिली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28015

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (430 of 2453 articles)


=केंद्रीय कृषिमंत्र्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघात= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची लूटमार झाली आहे. तेथील धरणे ...

×