Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » १.३० लाख लोकांनी केले हनुमान चालिसा पठण

१.३० लाख लोकांनी केले हनुमान चालिसा पठण

=गिनीज बुकात झाली नोंद=
Hanuman_Chalisa_Pthan worldrecordचेन्नई, [२ फेब्रुवारी] – तामिळनाडूतील तेनाली येथे नुकताच आगळावेगळा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. सुमारे १.३० लाख नागरिकांनी सलग चार तास हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केले. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्र्मध्ये नोंद करण्यात आली आहे.
गिनीज बुकचे अधिकारी स्वत: या ऐतिहासिक विक्रमाची नोंद करण्यासाठी उपस्थित होते. म्हैसूरस्थित श्री दत्त पीठाचे प्रमुख गणपती सच्चिदानंद स्वामी यांनी या सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते. तब्बल चार तास या परिसरात हनुमान चालिसाचा जप एकाच सुरात सुरू होता. यामुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या हेदेखील यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच अनेक आमदारही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गिनीज बुक अधिकार्‍यांनी सांगितले की, एकूण १ लाख २८ हजार ९१३ नागरिकांनी एकाच सुरात हनुमान चालिसाचे पठन केले. तिथे हनुमानाची मोठी प्रतिमाही लावण्यात आली होती. हा एक आगळाच विक्रम असल्याने आम्ही या विक्रमाची नोंद केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20240

Posted by on Feb 3 2015. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (2133 of 2452 articles)


=समितीची शिफारस= नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] - पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेल्या एका विशेष समितीने कालबाह्य ठरलेले १,७४१ कायदे मोडीत काढण्याची ...

×