Home » ठळक बातम्या, वाणिज्य » २००५ पूर्वीच्या नोटा १० दिवसांत परत करा

२००५ पूर्वीच्या नोटा १० दिवसांत परत करा

500_rupee change before 2005नवी दिल्ली, [२१ जून] – २००५ पूर्वीच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा परत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत संपण्यासाठी आता शेवटचे १० दिवसच उरले आहेत. ज्यांच्यकडे या नोटा असतील, त्यांनी ३० जूनपर्यंत बँकांना परत कराव्यात, असे आवाहन आरबीआयतर्फे करण्यात आले आहे. २००५ पूर्वीच्या या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याने नागरिकांनी ठरावीक अवधीतच त्या परत करून सहकार्य करावे. लोक या नोटा आपले खाते असलेल्या बँकेत किंवा घराजवळच्या कोणत्याही बँकेत परत करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. जुनाट नोटा परत करण्यासाठी आरबीआयने यापूर्वी १ जानेवारी ही अंतिम तारीख निश्‍चित केली होती. तथापि, लोकांना सोयीचे व्हावे यासाठी नंतर ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. या नोटा बँकांमध्ये बदलविताना नागरिकांना त्याचे संपूर्ण मूल्य परत मिळणार आहे. २००५ पूर्वीच्या नोटा ओळखणे अतिशय सोपे आहे. कारण, या चलनावर मागील बाजूला मुद्रणाची तारीख दिलेली नाही. तर, २००५ नंतर जारी करण्यात आलेल्या नोटांवर मागील बाजूला सर्वात खाली मुद्रणाची तारीख स्पष्टपणे दिसून येते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23051

Posted by on Jun 23 2015. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (1605 of 2455 articles)


पंतप्रधान मोदींसह ३९ हजार योगसाधकांची योगासने आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने झाले दोन विक्रम गिनीज बुकात नोंद [gallery ids="23074,23075,23076"] नवी दिल्ली, ...

×