Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » २०० ख्रिश्‍चनांची ‘घर वापसी’

२०० ख्रिश्‍चनांची ‘घर वापसी’

वलसाड, [२१ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत शनिवारी दक्षिण गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सुमारे २०० आदिवासी ख्रिश्‍चन नागरिकांनी हिंदू धर्मात प्रवेश केला.
वलसाडमधील अरनाई गावात शनिवारी हे ‘घर वापसी’ अभियान आयोजित करण्यात आले होते. हिंदू धर्मात प्रवेश करणारे सर्व ख्रिश्‍चन नागरिक यापूर्वी हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरीने त्यांना ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यांनी आता पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्यांचा मार्ग सुकर करून दिला, असे वलसाड येथील विहिंपचे स्थानिक नेते अजित सोळंकी यांनी सांगितले.
हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी कुणावरही बळजबरी करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू धर्म सोडून ख्रिश्‍चन धर्मात गेलेल्या नागरिकांना शिक्षण, अन्न व इतर मूलभूत सुविधाही पुरेशा मिळत नव्हत्या. जन्माने हिंदू परंतु नंतर ख्रिश्‍चन धर्म स्वीकारलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
दरम्यान, गुजरात सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल यांनी सांगितले की, वलसाड येथे झालेल्या धर्मांतराच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची सक्ती झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. प्रत्येकाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तक्रार आल्यास कारवाई करू, असेही पटेल यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19139

Posted by on Dec 22 2014. Filed under गुजरात, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, ठळक बातम्या, राज्य (2315 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२० डिसेंबर] - झारखंड आणि जम्मू-काश्मिरात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये या टप्प्यात ७०.४२ टक्के ...

×