Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » २०१५ हे सर्वात उष्ण वर्ष

२०१५ हे सर्वात उष्ण वर्ष

=संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेची नोंद=
tempratureजिनिव्हा, [२५ नोव्हेंबर] – २०१५ हे वर्ष तापमानाच्या दृष्टीने सर्वात उष्ण वर्ष असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या वातावरण बदलविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
मोजणी सुरू झालेल्या वर्षापासून यंदाच्या वर्षापर्यंत सागरी पृष्ठभागाच्या तापमानाची सर्वाधिक नोंद यंदा घेण्यात आली आहे. आजवरच्या इतिहासात सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून २०१५ ची घोषणा ही खरोखरीच एक अत्यंत वाईट बातमी आहे, असे मत जागतिक हवामान संस्थेचे प्रमुख मायकेल जेरूद यांनी व्यक्त केले. एरवी असे निष्कर्ष काढण्याकरिता संपूर्ण वर्षभर वाट पाहिली जाते. मात्र, पॅरिस परिषदेच्या निमित्ताने यंदा वर्षपूर्तीपर्यंत वाट पाहिली नसल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले.
अहवालानुसार यंदा नोव्हेंबरपर्यंतच्या दहाही महिन्यांमध्ये जमीन आणि समुद्राचे तापमान सर्वाधिक असल्याची नोंद घेण्यात आली. २०१४ मध्ये देखील ही नोंद तोपर्यंतच्या तापमानातील सर्वाधिक होती. मात्र, यंदा २०१४ पेक्षा तापमानात अधिक वाढ झाल्याचे संस्थेतर्फे अहवालात सांगण्यात आले आहे.
तसेच विषारी वायू आणि मानवी उत्सर्जनाद्वारे निर्माण होणार्‍या ऊर्जेतील ९० टक्के ऊर्जा समुद्राकरवी शोषली जाते. त्यामुळे सागराच्या तळातील तापमानात देखील वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. या वर्षाच्या मध्यावर साधारण जूनच्या आसपास समुद्री पातळीवर देखील १९९३ पासूनच्या उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या निरीक्षणातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चीनमध्ये या वर्षाची पहिली सहामाही अर्थात जानेवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१५ हा कालावधी सर्वात गरम म्हणून अनुभवत आहे, तर आफ्रिकेत दुसरी सहामाही सर्वात गरम जाणवणार आहे. त्याशिवाय भारत, पाकिस्तान, युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये उष्णतेच्या काही लाटा यंदा अनुभवण्यात आल्या.
१९ व्या शतकाच्या मध्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानवाढीपेक्षा तब्बल १ डिग्री सेल्सियसने झालेली यंदाची तापमान वाढ ही आजवरची प्रतीकात्मक आणि खर्‍या अर्थाने दखल घ्यावी अशी तापमान वाढ आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेने म्हटले असून या तापमान वाढीला मैलाचा दगड म्हणून नोंदवले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25729

Posted by on Nov 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1159 of 2458 articles)


=भाजपा व केंद्र सरकारचा घणाघाती आरोप, अनेक कलावतांचीही खानवर टीका= नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] - देशातील असहिष्णुता पाहू जाता, भारत ...

×