Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २०१९ नंतरही मोदीच पंतप्रधान हवे

२०१९ नंतरही मोदीच पंतप्रधान हवे

  • ७० टक्के भारतीयांची इच्छा
  • ताज्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती

narendramodi-pmनवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी कॉंगे्रससह सर्वच विरोधी पक्षांनी मोहीम हाती घेतली असली, तरी भारतीयांच्या मनात मोदीच असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही मोदी हेच पंतप्रधान असावेत, अशी इच्छा सुमारे ७० टक्के भारतीयांनी व्यक्त केली आहे.
२०१९ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी मोदी हेच आरूढ झालेले आम्हाला बघायचे आहे, असे नागरिकांचे मत आहे. विशेष म्हणजे, यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीने शुक्रवारी याबाबत घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. ६४ टक्के महिलांनीही मोदी हेच पंतप्रधान असावे आणि भाजपाचेच सरकार पुन्हा सत्तेत यावे, असे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांचेच सरकार देशात पुन्हा यायला हवे का, असा प्रश्‍न ६३,१४१ नागरिकांना विचारण्यात आला होता. त्यातील ७० टक्के नागरिकांनी मोदींनाच पहिली पसंती दिली. यातील १७ टक्के लोकांनी नाही, असे उत्तर दिले, तर १३ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.
‘युथ ऑफ द नेशन पोल’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून, २५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात ही पाहणी करण्यात आली. यात सहभागी झालेले ८० टक्के नागरिक ३५ वर्षांखालील वयोगटातील होते. या अभ्यासात ५७ टक्के लोकांनी काही राज्यांमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात यावी, अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये विद्यार्थी निवडणुकांवर बंदी घालायला हवी का, असे विचारले असता, ६१ टक्के तरुणांनी ‘होय’ असे, तर ३२ टक्के तरुणांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. सात टक्के लोकांनी ‘माहीत नाही’ असे सांगितले.
या अभ्यासात गेल्या दोन वर्षांच्या काळात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली का, हा प्रश्‍नही विचारण्यात आला होता. त्यावर ४६ टक्के लोकांनी ‘नाही’, ३३ टक्के लोकांनी ‘होय’ आणि २१ टक्के लोकांनी ‘माहीत नाही’ असे उत्तर दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29266

Posted by on Sep 4 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (101 of 2453 articles)


=पंतप्रधान मोदींची घोषणा, १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी= हनोई, [३ सप्टेंबर] - भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी ...

×