Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २०१९ पर्यंत दहा कोटी शौचालये उभारणार

२०१९ पर्यंत दहा कोटी शौचालये उभारणार

=राम कृपाल यादव यांची माहिती=
Ram_Kripal_Yadavबडोदा, [१५ मार्च] – नरेंद्र मोदी सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत देशात दहा कोटी शौचालये उभारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांनी आज रविवारी येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत ४० लाख घरांमध्ये शौचालये उभारण्यात आली आहेत. २०१९ पर्यंत देशात उघड्यावर शौच करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करून महात्मा गांधी यांना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ज्या राज्यांमध्ये शौचालये बांधण्याची गती संथ आहे, अशा राज्यांना ही गती वाढविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची सरकारची तयारी आहे. २०१९ पर्यंत १० कोटी शौचालये बांधण्यात आल्यानंतर उघड्यावर शौच करण्याची प्रथा पूर्णपणे बंद होईल, असा विश्‍वास यादव यांनी व्यक्त केला. भूसंपादन विधेयकाला विरोध करणार्‍या कॉंग्रेस पक्षावरही यादव यांनी जोरदार टीका केली. स्वच्छ पाणी, रस्ते आणि ऊर्जा प्रकल्प यासारख्या पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करण्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे, असेही यादव यावेळी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21459

Posted by on Mar 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1908 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका या तीन देशांच्या पाच दिवसांच्या दौर्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पहाटे ...

×