Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » २०२६ पर्यंत नरेंद्र मोदी यांचीच सत्ता!

२०२६ पर्यंत नरेंद्र मोदी यांचीच सत्ता!

=किरेन रिजिजू यांचा विश्‍वास=
Kiran Rijijuनवी दिल्ली, [१८ मार्च] – महान भविष्यवेत्ते नॉस्ट्रॅडॅमसच्या भाविष्यवाणीचा संदर्भ देत, नरेंद्र मोदी यांची राजवट भारतात २०२६ पर्यंत राहणार असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज शुक्रवारी आपल्या फेसबुकवरून दिला आहे. आज राजधानीत दिवसभर किरेन रिजिजू यांनी फेसबूकवर टाकलेल्या या मजकुराची चर्चा होती.
४५० वर्षापूर्वी नॉस्ट्रॅडॅमसने भारतात एका दैवी पुरुषाची राजवट येणार असल्याचे आपल्या भविष्यात नमूद केले होते. प्रारंभी या पुरुषाला फारशी लोकप्रियता मिळणार नाही, मात्र नंतर भारतातील लोक त्यांच्या प्रेमात पडतील, २०१४ ते २०२६ पर्यंत ही व्यक्ती भारताचे नेतृत्व करणार असून, भारताची दशा आणि दिशा बदलण्याची ताकद या व्यक्तीत राहणार असल्याचे या भविष्यात म्हटले होते. नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यात वर्णन केलेली व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्याचे किरेन रिजिजू यांनी आपल्या फेसबूकवर म्हटले आहे.
प्रौढत्वाकडे झुकलेल्या या व्यक्तीच्या नेतृत्वात भारतात सुवर्णकाळ येईल, भारतातच नाही जगात या व्यक्तीचे महत्त्व वाढेल, भारताची विश्‍वगुरूच्या दिशेने वाटचाल होईल, एवढेच नाही; तर जगातील अनेक देश भारताचे समर्थक बनतील, असे नॉस्ट्रॅडॅमसने १५५५ मध्ये लिहून ठेवले होते, याकडे रिजिजू यांनी लक्ष वेधले.
गुरुवारी मध्यरात्री किरेन रिजिजू यांनी एका छायाचित्रासह हा मजूकर आपल्या फेसबूकवर टाकला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केर यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आहेत. विशेष म्हणजे, या छायाचित्रात किरेन रिजिजूही आहेत. अंजेला मर्केर ऑक्टोबर २०१५ मध्ये दिल्लीत आल्या होत्या, त्यावेळचे हे छायाचित्र आहे.
या फेसबूकवर रिजिजू यांनी अंकशास्त्राशी संबधित काही आकडेवारी सादर केली, त्यात १३ आकड्याचे महत्त्व सांगितले आहे.
लोकसभेत भाजपाचे २८३ सदस्य आहे, या तीन आकड्यांची बेरीज १३ होते. लोकसभेत रालोआचे ३३७ सदस्य आहेत, याचीही बेरीज १३ होते. लोकसभेत संपुआचे ५८ सदस्य आहेत, या दोन आकड्यांची बेरीही १३ होते, त्याचप्रमाणे लोकसभेत अन्य पक्षांच्या जागा १४८ आहेत, या तीन आकड्यांची बेरीजही १३ होत असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले. मात्र या १३ चा अर्थ त्यांनी स्पष्ट केला नाही.
आज राजधानीत दिवसभर किरेन रिजिजू यांनी फेसबूकवर टाकलेल्या या मजकुराची चर्चा होती. १३ तासांत किरेन रिजिजू यांच्या फेसबूकवरील या मजकुराला पाच हजार लोकांनी लाईक केले असून, अडीच हजार लोकांनी शेअर केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27444

Posted by on Mar 19 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (618 of 2453 articles)


=पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक= [caption id="attachment_27442" align="alignleft" width="300"] KOLKATA, INDIA APRIL 9: (L- R) Actress Rupa Ganguly with Rahul Sinha, ...

×