२०३० नंतर जगात केवळ ६० टक्के पाणी!
Saturday, March 21st, 2015=जागतिक जल दिन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणीत इशारा=
नवी दिल्ली, [२० मार्च] – भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. अशा स्थितीत जगभरातील जल संसाधनांच्या वापरासंदर्भातील धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आला नाही, तर २०३० पर्यंत जगाच्या एकूण गरजेच्या ६० टक्केच पाण्याचा साठा शिल्लक राहील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर एका पाहणी अहवालातून दिला आहे.
जागतिक हवामानातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा असाच वाढत जाणार आहे. भूगर्भातील जलसाठ्याचा फार जास्त उपसा होत असल्याने जगातील भूजल पातळीचाही मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. २०५० पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या ९ अब्ज होण्याचा अंदाज असून, यामुळे वैयक्तिक वापरासह शेती व उद्योगांसाठी अधिकाधिक भूजल वापरण्याची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा भूजल पातळी खालावत असताना २०५० पर्यंत पाण्याची जागतिक मागणी ५५ टक्क्यांनी वाढणार आहे. अशा स्थितीत जलसंसाधनाच्या धोरणात बदल न झाल्यास २०३० पर्यंत पाण्याच्या एकूण गरजेच्या ६० टक्केच पाणी वापरासाठी उपलब्ध राहील, असे या अहवालात म्हटले आहे.
मागणी आणि पुरवठा यात योग्य समतोल न साधल्यास जगाला पाण्याच्या भीषण समस्येचा सामना करावा लागेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. देशांनी आपापल्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्यास, भविष्यात पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेची शाश्वती असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. अशाश्वत विकासाच्या वाटेवरील मार्गक्रमण आणि विविध देशांमधील सरकारांचे धोरणात्मक अपयश यामुळे जल संसाधनांच्या गुणवत्ता व उपलब्धतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. केवळ आर्थिक प्रगतीमुळे सर्वंकष सामाजिक प्रगती साधता येणार नाही, असा इशारा जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21624

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!