Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » २० उपग्रहांचे उद्या प्रक्षेपण

२० उपग्रहांचे उद्या प्रक्षेपण

=४८ तासांची उलटगणती सुरू=
isro logoबंगळुरू, [२० जून] – एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो सज्ज झाली असून, या उपग्रहासाठी ४८ तासांची उलटगणती आज सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली. हे मिशन यशस्वी झाल्यास इस्रोची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी ‘पीएसएलव्ही-सी३४’ या रॉकेटच्या माध्यमातून सर्व २० उपग्रह एकाचवेळी अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची उलटगणती आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी सुरू करण्यात आली.
बुधवारी अंतराळात झेपावणार्‍या उपग्रहांमध्ये भारताचा ‘अर्थ ऑब्झर्वेशन’ कार्टोसॅट-२ या उपग्रहाचाही समावेश आहे. या मिशनची तयारी करणार्‍या आढावा समितीने रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत ४८ तासांच्या उलटगणतीला मंजुरी दिली होती, अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
इस्रोने यापूर्वी २००८ मध्ये एकाच मिशनच्या माध्यमातून १० उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठविले होते. बुधवारी अंतराळात झेपावणार्‍या सर्व उपग्रहांचे एकूण वजन १२८८ किलो इतके आहे. यात अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशिया या देशांच्या उपग्रहांचा आणि भारतातील दोन विद्यापीठांच्या उपग्रहांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28656

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (215 of 2453 articles)


=इतिहास घडला...= हैदराबाद, [१८ जून] - आजचा दिवस केवळ देशासाठीच नव्हे, तर स्त्रीशक्तीसाठीही ऐतिहासिक असाच राहिला. अवनी चतुर्वेदी, भावना कांत ...

×