Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » २६/११चा खटला २ महिन्यात निकाली काढा!

२६/११चा खटला २ महिन्यात निकाली काढा!

=इस्लामाबाद हायकोर्टाचे आदेश=
REMEMBERING 26-11 MUMBAI ATTACKइस्लामाबाद, [१३ एप्रिल] – २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार झकिऊर रहमान लखवीला मुक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रखर टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पाकिस्तानने आता चक्क हा खटलाच गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा खटला दोन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज सोमवारी हा खटला हाताळणार्‍या विशेष न्यायालयाला दिला आहे.
दहशतवादविरोधी न्यायालयाने जर आम्ही निर्धारित केलेल्या कालावधीत या खटल्यातील सर्व सातही संशयितांच्या खटल्याचे कामकाज पूर्ण केले नाही, तर या प्रकरणी जामिनावर मुक्त असलेला झकिऊर रहमान लखवीचा जामीन रद्द करण्याची पाक सरकारची विनंती आम्हाला मान्य करावी लागेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
गेल्याच आठवड्यात लखवीला जामिनावर मुक्त करण्यात आल्यानंतर जगभरातून पाकवर टीका करण्यात आली. याच पार्श्‍वभूमीवर पाक सरकारने लखवीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली. त्यावर सुनावणी करताना दोन सदस्यीय खंडपीठाने उपरोक्त निर्देश दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22025

Posted by on Apr 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1800 of 2458 articles)


कन्नूर, [१३ एप्रिल] - नेताजी या नावाने लोकप्रिय असलेले सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांच्या हेरगिरीचे प्रकरण एकीकडे गाजत असले तरी दुसरीकडे ...

×