Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » २६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा

२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा

=अमेरिकेने पाकला ठणकावले=
jane saki usa forign ministry spoksmanवॉशिंग्टन, [१४ मार्च] – लष्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर झकिऊर रहमान लखवीला मुक्त करण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले असतानाच, मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा करण्याच्या आपल्या वचनाची तत्काळ पूर्तता करा, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले आहे.
मुंबई हल्ल्याचा कट रचणार्‍या, यात आर्थिक मदत करणार्‍या आणि शस्त्रांचा पुरवठा करणार्‍या अतिरेक्यांना कठोर शिक्षा करण्याचे वचन पाक सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले आहे. या वचनाची पूर्तता करणे पाकचे कर्तव्य आहे. पाकने या दिशेने तातडीने पावले उचलावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी पत्रकारांना सांगितले.
लखवीविरोधात भारताने सबळ पुरावे दिल्यानंतरही इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याची अटक बेकायदेशीर ठरवून त्याच्या मुक्ततेचे आदेश दिले. या घडामोडीवर आमचे बारीक लक्ष आहे, असेही त्या म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21431

Posted by on Mar 15 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1919 of 2458 articles)


=पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत, २१ तोफांची सलामी= कोलंबो, [१३ मार्च] - सध्या तीन देशांच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×