Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » २६/११ प्रकरणी हेडलीची आज साक्ष

२६/११ प्रकरणी हेडलीची आज साक्ष

  • पाकचा दहशतवादी चेहरा जगापुढे येणार
  • उज्ज्वल निकम यांची माहिती
  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर

David-Headley 26-11मुंबई, ७ [फेब्रुवारी] – २६/११ रोजीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली उद्या सोमवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष देणार असून, मुंबई हल्ल्याचा पाकमध्ये शिजलेला कट आणि तो कशा पद्धतीने अंमलात आणण्यात आला, याबाबतची सविस्तर माहिती देणार आहे. त्याच्या साक्षीमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहराही जगापुढे येणार आहे.
या खटल्यात शासनातर्फे कामकाज पाहणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच आज रविवारी ही माहिती दिली. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एखाद्या विदेशी दहशतवाद्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष देण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. त्याची साक्ष रेकॉर्ड केली जाईल. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्यामागे कुणाचा हात आहे, हे त्याच्या साक्षीवरून स्पष्ट होणार असल्याने ती आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे निकम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हेडलीच्या साक्षीतून बरीच उपयुक्त माहिती मिळणार आहे. यामागे दोन मोठी कारणे आहेत. पाकिस्तानमध्ये असलेला या हल्ल्यातील एक सूत्रधार अबु जिंदाल आणि दुसरे म्हणजे, पुरावे देऊनही ते पुरेसे नसल्याचा दावा करून पाकने ज्या सूत्रधारांवरील खटला प्रलंबित ठेवला आहे, त्यांचाही भंडाफोड यातून होणार आहे. यासोबतच, हेडलीच्या चौकशीतून पाकमध्ये शिजलेला व्यापक कट उघडकीस येणार आहे. हा कट नेमका कुठे तयार झाला, त्यात कोणाकोणाचा सहभाग होता, प्रशिक्षण कुठे देण्यात आले आणि त्यांचे म्होरके कोण होते, या सर्व गोष्टी जगापुढे उघड होणार आहेत.
सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या आणि ३५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या हेडलीने तेथील न्यायालयात शपथ घेऊन २६/११च्या कटाची सत्य माहिती देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे तो जे काही बोलेल, ते सत्य असेलच, असा विश्‍वास निकम यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या डिसेंबर महिन्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी अशाच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हेडलीची माफीचा साक्षीदार होण्याची अट मान्य केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26787

Posted by on Feb 8 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (843 of 2452 articles)


=‘वन रँक वन पेन्शन’= विशाखापट्टनम्, [७ फेब्रुवारी] - गेल्या ४२ वर्षांपासूून प्रलंबित असलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’शी संबंधित बहुतांश वचनांची ...

×