Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » २९ फेब्रुवारीला मांडणार अर्थसंकल्प

२९ फेब्रुवारीला मांडणार अर्थसंकल्प

arun jaitley8वी दिल्ली, [१४ जानेवारी] – २०१६-१७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली सादर करतील, अशी माहिती अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज दिली. अर्थसंकल्प सादर करण्याची जेटली यांची ही दुसरी वेळ आहे.
अर्थ मंत्रालय विविध कामगार संघटना, अर्थतज्ज्ञ, व्यावसायिक यांच्याशी सध्या चर्चा करीत आहे. अशा प्रकारच्या चर्चेमुळे सरकारला आपले धोरण ठरविण्यास मदत मिळते. सामान्य लोकांनाही यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने त्यांच्याकडूनही सूचना व सल्ले मागितले आहेत. अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्यासाठी अन्य मंत्रालयांशी देखील संवाद साधण्यात येत आहे. आर्थिक विकासावर जेटली विशेष लक्ष केंद्रित करतील, असे जाणकारांचे मत आहे.
जेटली यांच्या चमूत अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया आणि इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे. यासंबंधात जेटली यांनी बुधवारी देशातील नामांकित अर्थतज्ज्ञांची भेट घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26527

Posted by on Jan 16 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (909 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - देशात दरवर्षी होणार्‍या पाच लाखांवर रस्ते अपघातात दीड लाख लोक मृत्यमुखी पडतात, याबद्दल तीव्र चिंता ...

×