Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » २ फेब्रुवारीला पुण्यात राष्ट्रसंत साहित्य संमेलन

२ फेब्रुवारीला पुण्यात राष्ट्रसंत साहित्य संमेलन

Rashtrasant Tukdoji Maharajगुरुकुंज मोझरी, [२५ जानेवारी] – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी प्रीत्यर्थ अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २ फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वशांती केंद्र (आळंदी) एमएसआयटी, पुणे चे अध्यक्ष डॉ. विश्वनाथजी दा. कराड हे स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन २ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश ज. वाघ, उपसर्वाधिकारी रूपराव रा. वाघ, प्रचार प्रमुख बबनराव बा. वानखेडे, सरचिटणीस जनार्दन बा. बोथे, समन्वयक डॉ.रघुनाथ वाडेकर यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20033

Posted by on Jan 26 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2175 of 2451 articles)


इस्लामाबाद, [२५ जानेवारी] - शनिवारी मध्यरात्री अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात भीषण ऊर्जासंकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडीत ...

×