Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » २ लाख जवान बुलेटप्रुफ जॅकेटविना

२ लाख जवान बुलेटप्रुफ जॅकेटविना

IndianArmyनवी दिल्ली, [१३ मार्च] – बुलेटप्रुफ जॅकेटच्या टंचाईमुळे जवळपास दोन लाख भारतीत जवान जॅकेटविनाच आपले कर्तव्य बजावित आहेत. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी जॅकेट खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
यासंबंधातील अहवाल २००९ मध्ये केंद्र सरकारला सादर करण्यात आल्यानंतर, तांत्रिक कारणांमुळे बुलेटप्रुफ जॅकेटची खरेदी रखडली होती. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर सैन्यासाठी राखीव निधीची तदतूद करण्यात आली असून, यातून ५० हजार जॅकेट खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र याचा दर्जा बरोबर नसल्याचे कारण देत लष्कराने त्यांची खरेदी अद्याप केलेली नाही. गोळीबारापासून संरक्षण करतील असे जॅकेट्‌स कंपन्यांकडून खरेदी करण्याची लष्कराची तयारी असली, तरी लष्कराच्या सर्व चाचण्यांची पूर्तता कोणत्याही भारतीय कंपनीला पूर्ण करता आलेली नाही. अशा परिस्थितीत विदेशी कंपन्यांकडून हे जॅकेट्‌स खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेल्यास अधिक किंमत मोजावी लागणार आहे. यामुळे तात्पुरते का होईना, दुय्यम दर्जाचे जॅकेट खरेदी करावे असाही एका प्रस्ताव समोर आला आहे. पण जॅकेटअभावी जवानांना आपले बलिदान द्यावे लागणे ही दुर्देवी बाब असल्याचे मत एका लष्करी अधिकार्‍याने व्यक्त केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27279

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (674 of 2453 articles)


मुरादाबाद, [१३ मार्च] - कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने मंच कोसळला आणि त्यात भाजपाचे युवा नेते खा. ...

×