Home » केरळ, ठळक बातम्या, राज्य » ३० ख्रिश्‍चनांनी स्वीकारला हिंदू धर्म

३० ख्रिश्‍चनांनी स्वीकारला हिंदू धर्म

=केरळातही ‘घर वापसी’=
kerala-map-1अलपुझा, [२२ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्‍चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला.
आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी करून त्यांना ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. आज पुन्हा आपल्या धर्मात परत आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबातील नागरिकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात आले, त्यांचे नातेवाईक व मित्रवार यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होता.
या नागरिकांवर आम्ही कोणतीही जबरदस्ती केली आहे किंवा त्यांना आर्थिक प्रलोभनही दाखविले नाही. त्यांनी स्वेच्छेने हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे, असा दावा विश्‍व हिंदू परिषदेचे चेनगन्नू विभागाचे अध्यक्ष प्रताप पडिकल यांनी केला आहे. या भागातील आणखी सुमारे दीडशे कुटुंबांना हिंदू धर्मात यायचे आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात ‘घर वापसी’ अभियान राबविण्यात येणार असल्याचे पडिकल यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19169

Posted by on Dec 23 2014. Filed under केरळ, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in केरळ, ठळक बातम्या, राज्य (2313 of 2452 articles)


गुडगाव, [२१ डिसेंबर] - कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या मालकीची हरयाणात १४६.७५ एकर जमीन असून, त्यातील ...

×