३० लाखांच्या घरासाठी ९० टक्के कर्ज
Saturday, October 10th, 2015=आरबीआयचे दिशानिर्देश जारी=
नवी दिल्ली, [९ ऑक्टोबर] – घरांच्या सातत्याने वाढणार्या किमती आणि गृहकर्ज घेताना सुरुवातीला भरावयाची रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, घर घेणे अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरासाठी कर्जदारांना ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात यावे, अशा सूचना सर्व बँकांना जारी केल्या आहेत.
घर घेताना कर्जदाराला किमान २० ते २५ टक्के रक्कम सुरुवातीला आपल्या खिशातून भरावी लागते. घरांच्या वाढत्या किमतीमुळे ही रक्कम भरणे अनेकांना शक्य होत नसल्याने आरबीआयने हे दिशानिर्देश जारी केले आहेत. सोबतच गृहकर्जासंदर्भातील बँकांच्या जोखिमेचे प्रमाणही कमी करण्याचे धोरण आरबीआयने स्वीकारले आहे.
आरबीआयने नुकत्याच घेतलेल्या आपल्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात ०.५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्याला प्रतिसाद देत बँकांनीही आपल्या कर्ज योजनांवरील व्याजदर काही प्रमाणात कमी केले आहेत. त्यात आता आरबीआयने तब्बल ९० टक्के गृहकज देण्याचा निर्णय घेतल्याने हक्काच्या घराचे स्वप्न पाहणार्या सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
सध्या २० लाख रुपये किंमत असलेल्या घरांसाठीच ९० टक्के कर्ज मिळू शकते. यापेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांकरिता २० ते २५ टक्के रक्कम जवळून टाकावी लागते. बहुतांश शहरांमध्ये घरांच्या किमती २० लाखांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे कर्जदाराला अतिरिक्त पैशांचीही तरतूद करावी लागते. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना आता केवळ १० टक्केच निधी उभा करावा लागणार आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25083

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!