Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » ३२ हजार नवे पेट्रोल पंप उघडणार: धर्मेंद्र प्रधान

३२ हजार नवे पेट्रोल पंप उघडणार: धर्मेंद्र प्रधान

=पेट्रोलियम मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक=
dharmendra pradhanनवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] – पेट्रोलियम कंपन्यांचे जाळे देशभर पसरविण्याची सरकारची योजना असून, याचाच एक भाग म्हणून येत्या दहा वर्षांत देशात ३२ हजार नवे पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रधान बोलत होते. यावेळी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी उपस्थित होते. सध्या देशात ५३,८०० पेट्रोलपंप आहेत. मात्र, देशातील ग्राहकांची गरज भागविण्यात हे पेट्रोल पंप कमी पडतात. त्यामुळे ग्रामीण भागात, तसेच राष्ट्रीय महामार्गावर येत्या दहा वर्षांत आणखी ३२ हजार पेट्रोलपंप सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
पेट्रोलियम कंपन्यांना बाजारभावाशी स्पर्धा करता यावी, तसेच ग्राहकांना बाजारातील या स्पर्धेचा फायदा व्हावा म्हणून ऑक्टोबर २०१४ मध्ये डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्या. त्यामुळे एस्सार, रिलायन्स आणि शेलसारख्या कंपन्यांना पेट्रोलियम बाजारात उतरता आले आणि त्यांनी देशात ३ हजारांवर रिटेल आऊटलेट सुरू केल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांना स्वच्छ आणि हरित इंधन उपलब्ध व्हावे म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल आणि डिझेलमध्ये जैवडिझेल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे, याचा फायदा शेतकर्‍यांना मिळणार आहे, याकडे लक्ष वेधत प्रधान म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त झाल्यामुळे त्याचा फायदा जसा ग्राहकांना मिळाला, तसेच एलपीजीबाबतही काही ग्राहकाभिमुख निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे. एटीएफ, केरोसीन, पीएनजी, सीएनजी आणि ल्युब्रिकंटबाबतही असेच निर्णय घेतले जाणार आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा प्रधान यांनी यावेळी सादर केला. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नसून, कमीत कमी शासनात जास्तीत जास्त सुशासन आणणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाकडे प्रधान यांनी लक्ष वेधले.
राजीवप्रताप रुडी आणि अन्य सदस्यांनी यावेळी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. राजीवप्रताप रुडी आणि बैठकीला उपस्थित खासदारांचे धर्मेद्र प्रधान यांनी आभार मानले. बैठकीला पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव, अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच तेल कंपन्याचे अध्यक्ष उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24049

Posted by on Sep 25 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (1410 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [२४ सप्टेंबर] - जगातील अग्रगण्य पेप्सिको कंपनीच्या प्रमुख इंद्रा नुयी यांना यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलचा (युएसआयबीसी) २०१५ चा जागतिक लीडरशीप ...

×