Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित

३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित

=केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती=
supreme_court_1नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – देशातील एक चतुर्थांश म्हणजेच ३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित असून, एकूण २५६ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे विदारक वास्तव केंद्र सरकारने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले.
स्वराज अभियान या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला दुष्काळाविषयी विचारणा केली असता, सरकारने उपरोक्त माहिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २६ एप्रिलला होणार आहे.
दुष्काळी स्थितीवर कठोर भूमिका स्वीकारताना, दुष्काळ प्रभावित राज्यांमध्ये किती लोकांना मनरेगांतर्गत १५० दिवस काम देण्यात आले आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. यावर, आम्ही लवकरच याबाबतची सविस्तर माहिती सादर करू, असे उत्तर सरकारतर्फे देण्यात आले.
कोणत्या राज्यात किती पाऊस पडणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र सरकारला उपग्रहाच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे संबंधित राज्यांना पावसाबाबत इशारा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच असते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
तत्पूर्वी, सरकारने न्यायालयाला सांगितले की, यावर्षी मनरेगाकरिता ३८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातील १९,५०० रुपयांचा निधी राज्यांना वितरित करण्यात आला आहे. याशिवाय, लवकरच सात हजार कोटी रुपये जारी होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27922

Posted by on Apr 20 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (459 of 2453 articles)


=रावसाहेब दानवे यांच्याकडून जनतेचे आभार= मुंबई, [१९ एप्रिल] - राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे पाचशे ग्रामपंचायतींमध्ये भारतीय ...

×