Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ३ वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी करमुक्त?

३ वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी करमुक्त?

=अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा=
Fixed Depositsनवी दिल्ली, [२३ जानेवारी] – सर्वसामान्य नागरिकांना बचतीकरीता प्रेरित करण्यासाठी आणि देशातील दीर्घ मुदतीच्या बचतीचे प्रमाण वाढविण्यासाठी तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवण्यात येणार्‍या मुदती ठेवी करमुक्त करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. पुढील महिन्याच्या २८ तारखेला भाजपाप्रणीत रालोआ सरकार आपला पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. यात याबाबतची घोषणा केली जाऊ शकते.
केंद्र सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणाराच ठरू शकतो. अशा ठेवी करमुक्त करण्यासोबतच उद्योगांसाठी असलेल्या कर रचनेतही बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली सध्या देशाचा अर्थसंकल्प कसा असावा, याबाबत विविध घटकांसोबत चर्चा करीत आहेत. अलीकडेच त्यांनी अर्थसंकल्पावर उद्योग क्षेत्राचे मत जाणून घेतले आहे. उद्योगांनी काही प्रस्ताव सादर केले असून, त्यावर सरकार विचार करीत आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी करमुक्त करण्यात याव्या, असा प्रस्ताव बहुतांश उद्योगांकडून आला आहे. सोबतच, अल्पबचतीवरील रक्कमही करसवलतीस पात्र असावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. हे सर्व प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत, असे सूत्राने सांगितले.
ठेवींची मुदत कमी असल्यास जास्तीत जास्त ठेवी मिळवणे शक्य होऊ शकते, असे मत एका बैठकीत काही वित्तीय संस्थांच्या प्रमुखांनी अर्थमंत्री जेटली यांच्याकडे व्यक्त केले होते. अशा ठेवी करमुक्त झाल्यास त्याचा सर्वात मोठा फायदा बँकिंग क्षेत्रालाच होणार आहे, असे मतही या संस्थांनी व्यक्त केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19993

Posted by on Jan 24 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2186 of 2453 articles)


=एआरएआयतर्फे आयोजित सियाट-२०१५ परिषदेचा समारोप= पुणे, [२३ जनेवारी] - भारताला सध्या दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचे खनीज इंधन परदेशी चलनात ...

×