Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ४०० वरून ४० वर आल्याने बदला घेताहेत्

४०० वरून ४० वर आल्याने बदला घेताहेत्

=पंतप्रधानांचा गांधी घराण्यावर घणाघाती हल्ला=
pm-narendra-modiमोरान, [५ फेब्रुवारी] – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाचा दारुण पराभव झाल्याने, या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे आता देशवासीयांवर सूड उगवत आहेत. पराभवाचा बदला घेण्यासाठीच या नेत्यांनी गरिबांच्या फायद्यासाठी असलेल्या विधेयकांचा पारित होण्याचा मार्ग रोखून धरला आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे केला.
विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या आसामच्या या भागात चहाच्या मळ्यातील कामगारांच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सोनिया व राहुल यांच्यासोबतच कॉंगे्रसलाही आडव्या हाताने घेतले. केवळ एक कुटुंब नकारात्मक राजकारण करीत आहे. याच कॉंगे्रसप्रणीत संपुआतील अन्य घटक पक्ष माझ्या सरकारसोबत वैचारिक मतभेद असतानाही, संसदेचे कामकाज सुरळीत चालावे आणि लोककल्याणाशी संबंधित महत्त्वाची विधेयके पारित व्हावी, यासाठी अनुकूल आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
आतापर्यंत संसदेत सुमारे ४००च्या आकड्यावर राज्य करणारे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४० वर आले आहेत. हा पराभव त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. देशाचे काही झाले, तरी मोदी सरकारला काम करू द्यायचे नाही, असा चंगच त्यांनी बांधलेला आहे आणि म्हणूनच ते देशाला प्रगतिपथावर नेणारे सरकारचे सर्वच मार्ग रोखत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. यावेळी त्यांनी कॉंगे्रसच्या नकारात्मक राजकारणात संसदेत अडकून पडलेल्या विधेयकाची यादीच वाचून दाखविली. अशा नकारात्मक राजकारणाचा देशाला कधीच फायदा होणार नाही. पण, देशहिताची काळजी नसलेल्या या घराण्याला त्याचे काहीच वाटत नाही, अशी टीकाही मोदी यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26736

Posted by on Feb 6 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (857 of 2453 articles)


=भारताने पाकला सुनावले= नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] - पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदने भारताविरोधात पुन्हा गरळ ओकल्याच्या पार्श्‍वभूमीवर, भारताने कठोर ...

×