Home » क्रीडा, ठळक बातम्या » ५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल

५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल

नवी दिल्ली, [२५ जुलै] – भारताची विख्यात बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिला याक्षणापर्यंत आंध्र प्रदेश सरकारकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला नाही. सायनानेच ही माहिती दिली.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देण्यात सायनाचा वाटा होता. ऑलिम्पिकपदक जिंकल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. दरम्यान तेलंगणा राज्य सरकारने विश्‍व विख्यात टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला राज्याची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर नियुक्त केल्याबद्दल नेहवालने राज्य सरकारचे अभिनंदन केले. मिर्झाला राज्य सरकारकडून प्रशिक्षणासाठी एक कोटी रुपये मिळणार आहेत.
या घटनेनंतर नेहवालने आपली वेदना व्यक्त केली. मला तेलंगणावर अभिमान आहे, पण ऑलिम्पिकपदक मिळविल्यानंतरही आजपर्यंत घोषित राशी हाती पडू नये या घटनेने मी फारच दु:खी झाली आहे याकडे लक्ष वेधून नेहवाल म्हणाली की, ज्यावेळी पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी तेलंगणा राज्य वेगळे झालेले नव्हते.
तत्कालीन मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी माझे अभिनंदन केले होते व पुरस्कार राशी देण्याची घोषणा केली होती पण त्या पुरस्काराची मी चातकासारखी वाट बघत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14444

Posted by on Jul 26 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2393 of 2455 articles)


ग्लास्गो, [२५ जुलै] - राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवातील दुसर्‍या दिवशी भारताचा विश्‍व विख्यात नेमबाज अभिनव बिन्द्रा याने सुवर्णपदक आणि त्यापूर्वी १६ ...

×