Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ५० हजारांपेक्षा अधिक रोख खरेदीसाठी पॅनकार्ड बंधनकारक

५० हजारांपेक्षा अधिक रोख खरेदीसाठी पॅनकार्ड बंधनकारक

PAN - Permanent Account Numberनवी दिल्ली, [३१ डिसेंबर] – काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्या शुक्रवार १ जानेवारीपासून ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे हॉटेल बिल व रोख खरेदी व्यवहारांसाठी पर्मनंट अकाऊंट नंबर अर्थात पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय इतर सर्व व्यवहारांसाठी जसे की, दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे दागिने रोख किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १ जानेवारी २०१६ पासून त्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अचल संपत्ती खरेदीसाठीही पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. बँका, टपाल कार्यालये किंवा एनबीएफसीमध्ये एकाचवेळी ५० हजारांपेक्षा जास्त किंवा वार्षिक पाच लाख रुपयांच्या मुदती ठेवीसाठीही पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले आहे.
याशिवाय प्रधानमंत्री जनधन योजना वगळता इतर सर्व बँक खाती उघडण्यासाठीही पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या रोख किंवा कार्डद्वारा होणार्‍या व्यवहारांसाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याच महिन्यात संसदेत बोलताना स्पष्ट केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26344

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (962 of 2453 articles)


‘शुक्र तारा’ निखळला साहित्य क्षेत्रावर शोककळा मुंबई, [३० डिसेंबर] - ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ या कवितेच्या ...

×