Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ५ लाख खातेधारकांना मिळणार डेबिट कार्ड

५ लाख खातेधारकांना मिळणार डेबिट कार्ड

=भारतीय टपाल विभागाचा पुढाकार=
Debit-Cardनवी दिल्ली, [१४ जून] – आपल्या बचत खातेधारकांना आगामी दोन महिन्यात वैयक्तिक डेबिट कार्ड देण्याच्या दिशेने भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. देशभरातील टपाल विभागांमध्ये सुमारे पाच लाख बचत खातेधारक आहेत.
टपाल विभागाने गेल्या वर्षीपासून आपल्या सर्व बचत खातेधारकांना डेबिट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वेगळ्या एटीएमची निर्मिती करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला ही योजना राबविताना आतापर्यंत सुमारे १० हजार डेबिट कार्ड देण्यात आले आहेत, अशी माहिती टपाल विभागाचे उपमहासंचालक एल. एन. शर्मा यांनी दिली. पुढील दोन महिन्यात पाच लाख नवे काडर्‌‌स देण्याचे आमचे लक्ष्य आहे. पहिल्या टप्प्यात खातेधारकांना देशभरातील २६०० मोठ्या शाखांमध्ये काडर्‌‌स देण्यात येतील. तसेच सुरुवातीला टपाल खात्याच्या केवळ ११५ एटीएममध्येच त्यांचा वापर करता येऊ शकेल. पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत एक हजार नवे एटीएम सुरू केले जातील, असेही शर्मा यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22919

Posted by on Jun 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1619 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ जून] - ईशान्ये भारतातील राज्यांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची कारवाई बांगलादेशच्या अधिकार्‍यांनी सुरू केली आहे. सीमा ...

×