Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » ६०० अतिरेक्यांचा खात्मा

६०० अतिरेक्यांचा खात्मा

=रशिया, फ्रान्सचे इसिसवर हल्ले, १५ तेल विहिरी, तेलाचे ५२३ ट्रक्सही उद्‌ध्वस्त=
4 Russian warships launch 26 missiles on isisमॉस्को, [२१ नोव्हेंबर] – पॅरिस हल्ला आणि रशियाचे विमान पाडण्याच्या घटनेचा बदला घेण्याचे सत्र सुरूच ठेवताना रशिया आणि फ्रान्सने इसिसचा बालेकिल्ला असलेल्या सीरियातील राक्का शहर आणि आसपासच्या असंख्य गुप्त अड्ड्यांवर भीषण हवाई हल्ले केले. यात ६०० अतिरेकी ठार झाले असून, इसिसचा आर्थिक कणा असलेल्या तेलाच्या विहिरीही उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.
इसिसने गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसवर आत्मघाती हल्ला करून १३२ नागरिकांचा बळी घेतला होता. तेव्हापासूनच फ्रान्स आणि रशियाने इसिसला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा जणू विडाच उचलला आहे. या कालावधीत दोन्ही देशांनी इसिसच्या ठिकाणांवर ५२२ हल्ले केले असून, १०० कू्रझ क्षेपणास्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे १४०० बॉम्ब तयार ठेवले आहेत.
आज शनिवारी सकाळपासून १८ कू्रझ क्षेपणास्त्रे इसिसच्या ठिकाणांवर डागण्यात आली असून, या सर्वच क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा अचूक भेद घेतला आहे. लढाऊ विमानांचीही संख्या वाढविण्यात आली असून, सध्या ६९ विमाने इसिसच्या १४३ ठिकाणांवर बॉम्ब टाकत आहेत, अशी माहिती रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगू यांनी राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिली.
सोबतच, इसिसची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करून, या संघटनेची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी आम्ही आतापर्यंत इसिसच्या ताब्यातील १५ तेल भांडार आणि ५२३ तेलाचे ट्रक्सही नष्ट केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इसिसची २३ प्रशिक्षण शिबिरे, बॉम्ब तयार करणारे १९ कारखाने आणि ४७ शस्त्रागारही नष्ट झाली आहेत, असेही त्यांनी राष्ट्राध्यक्षांना सांगितले. इसिसने रशियन एअरलाईन्सचे विमान पाडल्यानंतर पॅरिसवर मोठा हल्ला केला होता. विमान पाडण्याच्या घटनेत २२४ नागरिकांचा आणि पॅरिसवरील हल्ल्यात १३२ जणांचा मृत्यू झाला होता.
इसिसला असाही संदेश
रशिया आणि फ्रान्स इसिसच्या ठिकाणांवर एकामागोमाग बॉम्ब टाकत आहे. याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, या प्रत्येक बॉम्बच्या माध्यमातून इसिसला कठोर संदेश दिला जात आहे. आग ओकणार्‍या प्रत्येक बॉम्बवर दोन संदेश ठळकपणे लिहिण्यात आले आहेत. रशियाकडून टाकण्यात येणार्‍या बॉम्बवर ‘आमचे विमान पाडण्याचा बदला’ आणि फ्रान्सकडून टाकण्यात येणार्‍या बॉम्बवर ‘पॅरिसवरील हल्ल्याचा बदला’ असे लिहिले जात आहे. या बॉम्बचे छायाचित्रही रशिया आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने व्हिडीओवरून जारी केले आहेत.
इसिसविरुद्धच्या या लढाईत ब्रिटनने रशियाला सहकार्य करावे, असे आवाहन रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना केले आहे. सध्या ब्रिटन अमेरिकेच्या नेतृत्वातील आघाडीचा सहकारी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25643

Posted by on Nov 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1187 of 2458 articles)


पंतप्रधान मोदी यांची ग्वाही पारदर्शक करप्रणाली आणण्याची ग्वाही अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यावर भर क्वालालम्पूर, [२१ नोव्हेंबर] - एकविसावे शतक ...

×