Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ६० मुस्लिम कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात दाखल

६० मुस्लिम कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात दाखल

RSS-Re-converts-200-Muslims-to-Hinduism-in-Agraआग्रा, [९ डिसेंबर] – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ३८७ मुसलमानांना विधीपूर्वक पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्मजागरण समन्वय विभाग आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आखला गेला होता. ‘पुरखों की घर वापसी’ या नावाने आयोजित कार्यक्रमात जवळपास ६० मुस्लिम कुटुंबांना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्यात आला.
भगवा ध्वज आपल्या घरावर लावून त्यानंतर धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारणांसोबत देवाच्या मूर्तींना अभिषेक करीत या मुस्लिम परिवारांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यांनी डोक्याला टिळा लावला तसेच यज्ञात हवन देखील केले. त्यानंतर त्या लोकांच्या नावाची यादी तयार करण्यात आली असून यामुळे त्यांना नवे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र देता येईल.
मी आधी कुराण वाचत असे आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करीत असे. आता मात्र मी या वयात भगवान गणेशाची आरती करणार आहे, याचा मला आनंद आहे. दोन्ही धर्मातील शिक्षणात मला जास्त फरक जाणवत नाही, असे हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍या ७० वर्षीय सुफिया बेगम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
‘या कार्यक्रमासंदर्भात पोलिसांशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. जर लोक स्वेच्छेने धर्म बदलू इच्छित असतील तर त्यांना तसे करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. धर्माचा स्वीकार किंवा त्याग हा देशातील जनतेचा मूळ अधिकार आहे,’ असे संघाचे पदाधिकारी राजेश्‍वर सिंह यांनी सांगितले की, ३००पेक्षा अधिक मुस्लिमांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला आहे. तसेच, अलीगड येथे देखील पाच हजारांहून अधिक मुसलमान आणि ख्रिश्‍चन लोकांना त्यांच्या मूळ धर्मात आणले जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18887

Posted by on Dec 9 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2324 of 2452 articles)


=शेतकर्‍यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ= नागपूर, [८ डिसेंबर] - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या ...

×