Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » ६ महिन्यात अतिरेक्यांची सर्व शिबिरे उद्ध्वस्त करू

६ महिन्यात अतिरेक्यांची सर्व शिबिरे उद्ध्वस्त करू

=भारतीय लष्कराचा सरकारपुढे प्रस्ताव=
indian-armyनवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – गुलाम काश्मिरातील सर्जिकल ऑपरेशनमुळे आत्मविश्‍वास द्विगुणित झालेल्या लष्कराने पाकी दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अतिशय धाडसी योजना तयार केली आहे. आम्हाला केवळ सहा महिन्यांची मुदत द्या, गुलाम काश्मिरात घुसून आम्ही तेथील सर्व दहशतवादी शिबिरे आणि अतिरेक्यांचा खात्मा करतो, असा ठोस प्रस्ताव लष्कराने केंद्र सरकारकडे सादर केला आहे.
एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने ही माहिती दिली. अतिरेक्यांनी घुसखोरी करायची आणि जवानांवर हल्ला करायचा. त्यानंतर आपण तिथे सर्जिकल कारवाई करायची. अशा पद्धतीने दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा होणार नाही. ते वारंवार आपली शिबिरे उघडतील आणि भारतावर हल्ला करतील, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.
आम्हाला एकाच वेळी मोठी कारवाई करण्याची परवानगी हवी आहे. सहा महिन्यात आम्ही ती यशस्वी करून दाखवतो. त्यानंतर गुलाम काश्मिरात एकही अतिरेकी जिवंत राहणार नाही, असे या अधिकार्‍याने सांगितले.
आपल्याला केवळ जम्मू-काश्मिरात होणार्‍या अतिरेकी हल्ल्यांचाच सामना करायचा नाही, तर देशाच्या अन्य भागांमध्येही अतिरेक्यांकडून होणारे हल्ले परतावून लावायचे आहे. एकदा गुलाम काश्मिरातील अतिरेक्यांची प्रशिक्षण शिबिरे पूर्णपणे नष्ट झाली, तर ही समस्या भविष्यात कधीच उद्‌भवणार नाही, असे ते म्हणाले.
गुलाम काश्मिरात ४० दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यात अजूनही सुमारे २०० अतिरेकी आहेत. त्यांना भारतात पाठविण्यासाठी ५० पेक्षा जास्त लॉन्च पॅड तयार करण्यात आले आहेत, याकडेही अधिकार्‍याने लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29348

Posted by on Oct 7 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (80 of 2453 articles)


नागपूर, [६, ऑक्टोबर] - आपण सगळे जाणताच की सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानने आश्रय दिलेल्या ...

×