Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » ७/११ साखळी बॉम्बस्फोटातील ५ जणांना फाशी

७/११ साखळी बॉम्बस्फोटातील ५ जणांना फाशी

=तर ७ जणांना जन्मठेप=
mumbai-high-courtमुंबई, [३० सप्टेंबर] – ११ जुलै २००६ रोजी मुंबईला हादरवणार्‍या साखळी बॉम्बस्फोटातील निकाल आज लागला असून यातील १२ पैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अन्य ७ दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरविले होते. त्यांना आज अंतिम शिक्षा सुनावली. तब्बल ९ वर्षे हा खटला चालला असून सरकारी पक्षाकडून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. विशेष मोक्का न्यायालयात २३ एप्रिल २०१० रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली होती. या खटल्यादरम्यान न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १९२ साक्षीदार, बचाव पक्षातफेर् ५२ साक्षीदार, तसेच एक न्यायालयीन अशा एकूण २४५ जणांचे जबाब नोंदवले गेले होते. विशेष मोक्का न्यायालयाने कमल अन्सारी, एहतशाम सिद्दीकी, मोहम्मद शेख, नाविद हुसेन खान, आसिफ बशीर खान यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मुंबईतील पश्‍चिम रेल्वेमार्गावर ११ जुलै २००६ रोजी लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. विविध ठिकाणी लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात केवळ ११ मिनिटांमध्ये झालेल्या ७ स्फोटांनी अख्खी मुंबई हादरली होती. या बॉम्बस्फोटात तब्बल १८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्‍वरी, बोरिवली आणि भाईदर या ठिकाणी हे स्फोट झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24131

Posted by on Sep 30 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1386 of 2452 articles)


=राष्ट्रीय हरित राजमार्ग धोरणाची घोषणा= नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] - पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी शब्द नसून एकमेकांना पूरक आहेत. ...

×