Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ७३ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

७३ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

devendra-fadnavis7मुंबई, [२८ एप्रिल] – मागील काही दिवसांपासून सूरू असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठे फेरबदल केले असून ७३ ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री आणि या अधिकार्‍यांमध्ये अनेक कारणांमुळे खटके उडत होते. सनदी अधिकारी आमचे ऐकत नाही, त्यांना वठणीवर आणा अशी तक्रार अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. यांच्यातील वाद, विकोपास गेलेले शीतयुद्ध , तर काही मंत्र्यांनी आपले सचिव बदलण्याबाबत केलेली तक्रार आणि स्वपक्षीय आमदारांच्या नाराजीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंरद फडणवीस यांनी बुधवारी प्रशासनात मोठे फेरबदल केले. या निर्णयातर्ंगत ७३ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांची बदली करून त्यांना उच्च आणि तंत्रज्ञान खात्याच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28053

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (415 of 2451 articles)


=महाराष्ट्र सदन व अन्य प्रकल्पांतील घोटाळा= मुंबई, [२७ एप्रिल] - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या ...

×