Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ७४ औषधांवरील अबकार सवलत काढली

७४ औषधांवरील अबकार सवलत काढली

=कॅन्सर, एड्‌सवरील उपचार महागणार=
CustomLogo-SpotColorनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – कर्करोग आणि एचआयव्ही/एड्‌सवरील औषधांसह एकूण ७४ औषधांच्या आयातीवरील अबकारी सवलत सरकारने काढून टाकली असल्याने या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार असून, विशेषत: कर्करोग आणि एड्‌सवरील उपचारही महागणार आहे.
केंद्रीय अबकारी आणि जकात मंडळाने गेल्या आठवड्यात या सर्व ७४ औषधांच्या आयातीवरील अबकारी सवलत काढून टाकण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली. ज्या औषधांवर आता अबकारी शुल्क आकारण्यात येणार आहे, त्यात किडनी स्टोनवरील उपचार, कॅन्सर केमोथेरेपी ऍण्ड रेडिओथेरेपी, हृदयातील ठोके सुरळीत करणारे औषध, मधुमेह, पार्किनसनचे आजार, हाडांचे आजार आणि साथीच्या रोगांवर उपचार करणारे ऍन्टिबायोटिक्स यासारख्या औषधांचा समावेश असून, त्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, लुकेमिया, ऍनेस्थेटिक मेडिकेशन, एचआयव्ही, हेपॅटायटिस बी व्हायरस पेशी, ऑर्थ्रायटिस यासारख्या आजारांवर उपचार करणारी औषधेही आता महाग होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26740

Posted by on Feb 7 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (855 of 2453 articles)


=सातवा वेतन आयोग, वन रँक वन पेन्शन= नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] - माजी सैनिकांची ‘वन रँक वन पेन्शन’ आणि केंद्रीय ...

×